ग्लॅडस्टन, विल्यम यूअर्ट
ग्लॅडस्टन, विल्यम यूअर्ट : (२९ डिसेंबर १८०९ - १९ मे १८९८). प्रसिद्ध ब्रिटिश मुत्सद्दी व इंग्लंडचा इतिहासप्रसिद्ध पंतप्रधान. याचा जन्म लिव्हरपूल (इंग्लंड) येथे एका सधन कुटुबांत झाला. त्याचे वडील जॉन हे एक बडे व्यापारी, पार्लमेंटचे सभासद व कॅनिंगचे अनुयायी म्हणून प्रसिद्ध होते.